मुलींच्या शिक्षणावरील खर्चासाठी महिलांचा आग्रह हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:20 IST2021-03-19T04:20:27+5:302021-03-19T04:20:27+5:30
तिसगाव : विवाहातील खर्चांच्या उधळपट्टीऐवजी मुलींच्या आवडी निवडीसह त्यांच्या शिक्षणावरील खर्चांसाठी महिलांचा आग्रह हवा, असे प्रतिपादन कवी अनिल कोठे ...

मुलींच्या शिक्षणावरील खर्चासाठी महिलांचा आग्रह हवा
तिसगाव : विवाहातील खर्चांच्या उधळपट्टीऐवजी मुलींच्या आवडी निवडीसह त्यांच्या शिक्षणावरील खर्चांसाठी महिलांचा आग्रह हवा, असे प्रतिपादन कवी अनिल कोठे यांनी केले.
श्री क्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथे संत माधव स्वामी ग्रामीण विकास व सृजन संस्थेच्यावतीने महिलांना मास्कचे मोफत वितरण करण्यात आले. ‘महिलांच्या आरोग्यासाठीचे दोन शब्द’ अशा ऑनलाइन संवाद कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, डॉ. वसंत डमाळ, सरपंच मीना शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य गणेश गायकवाड आदी उपस्थित होते. सौंदर्याच्या चुकीच्या संकल्पनांमध्ये समाजाने स्रिला अडकवून ठेवले आहे. दैवाने दिलेले सौंदर्य हे कोणावर प्रभाव टाकण्यासाठी किंवा प्रभावित करण्यासाठी नाही. सौंदर्याची सर्वांगीण जोपासना करताना व्यक्तिगत आरोग्यही तितकेच महत्त्वाचे, अशी अपेक्षा कोठे यांनी व्यक्त केली.
उपसरपंच सुनीता बर्डे, ग्रामपंचायत सदस्य दुर्गा बर्डे, शीतल शिरसाठ, मीनाक्षी बांदल, मीनाबाई बर्डे, संजीवनी बर्डे, ज्योती बर्डे, सरस्वती गायकवाड, गिरजा बर्डे, मीनाक्षी वांढेकर, सविता क्षीरसागर आदींनी सहभाग घेतला.