स्त्रियांनी वाचनाबरोबरच निर्णय क्षमता वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:26+5:302021-03-10T04:22:26+5:30
कर्जत : सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांचा आदर्श स्त्रियांनी डोळ्यासमोर ठेवावा. वाचन, चिंतनाबरोबरच निर्णय क्षमता व अभिव्यक्तीसाठी सर्व शक्ती ...

स्त्रियांनी वाचनाबरोबरच निर्णय क्षमता वाढवावी
कर्जत : सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांचा आदर्श स्त्रियांनी डोळ्यासमोर ठेवावा. वाचन, चिंतनाबरोबरच निर्णय क्षमता व अभिव्यक्तीसाठी सर्व शक्ती पणास लावावी, तरच वास्तवात स्त्री-पुरुष समता प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन अहमदनगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालयातील प्रा.डॉ. दया भोर यांनी केले.
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण समिती अंतर्गत गुणवत्ता सुधार समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. भोर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. भास्कर मोरे, प्रा.डॉ.महेंद्र पाटील, महिला सक्षमीकरण समिती प्रमुख प्रा.माधुरी गुळवे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. प्रमोद परदेशी, डॉ. सुमन पवार उपस्थित होते.
डॉ. भोर पुढे म्हणाल्या की, वास्तव आणि अवास्तवतेचा आभास निर्माण करून स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रस्थापित केला जात आहे. तो बदलण्याची क्षमता स्त्रियांमध्ये आहे. स्त्रियांनी यासाठी प्रयत्न करावा.
प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी लोकशाहीतील मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणली तर स्त्री-पुरुष विषमतेची दरी नष्ट होईल, असे मत व्यक्त केले.
प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर दादा पाटील व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. प्रा. माधुरी गुळवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. प्रतिमा पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. सुमन पवार यांनी आभार मानले.