उत्सवकाळात महिलांनी सतर्क राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST2021-09-19T04:22:27+5:302021-09-19T04:22:27+5:30
शहरातील कजबे वस्ती परिसरातील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या गणरायाची गडकरी यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या ...

उत्सवकाळात महिलांनी सतर्क राहावे
शहरातील कजबे वस्ती परिसरातील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या गणरायाची गडकरी यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी शोभा दातीर, जयश्री जायकर, मेघा काळे, अंकिता सानप, वैशाली डफळ, ज्योती वाव्हाळ, वृषाली शिरसाठ, पूनम भोर, ज्योती घाडगे, मंडळाचे अध्यक्ष निशांत दातीर, पत्रकार कुणाल जायकर, प्रा. चंद्रकांत वाव्हाळ, गणेश भोर, चंद्रकांत शिरसाठ, विशाल गुंजाळ, युवराज कजबे, सुरेश जायकर, प्रा. हेमंत कुटे, श्रेयश कडूस, हर्ष वाकोडे, श्रेयश शिंदे, आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाल्या की, सध्या सर्वत्र कोरोना महामारीचे संकट असताना सण-उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करावे. नागरिकांनी रात्री-अपरात्री संशयितरीत्या फिरणाऱ्यांची चौकशी करावी. कॉलनी व परिसरातील महिलांनी व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहावे. यावेळी निशांत दातीर यांनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन कुणाल जायकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत वाव्हाळ यांनी केले. आभार हेमंत कुटे यांनी मानले.
----------
फोटो १८ गणपती आरती
फोटो - कजबे वस्ती परिसरातील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी शोभा दातीर, जयश्री जायकर, मेघा काळे, अध्यक्ष निशांत दातीर, कुणाल जायकर, प्रा. चंद्रकांत वाव्हाळ, चंद्रकांत शिरसाठ, आदी.