स्वत:चे संरक्षण करण्यासाठी महिलांनी सक्षम व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:38 IST2021-03-13T04:38:19+5:302021-03-13T04:38:19+5:30

यामध्ये एमआयडीसीमधील स्थलांतरित महिला कामगारांना महिला शोषण प्रतिबंधात्मकतेच्या उपाययोजनेची माहिती देऊन कायद्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दिलासा सेलच्या साहाय्यक ...

Women should be able to protect themselves | स्वत:चे संरक्षण करण्यासाठी महिलांनी सक्षम व्हावे

स्वत:चे संरक्षण करण्यासाठी महिलांनी सक्षम व्हावे

यामध्ये एमआयडीसीमधील स्थलांतरित महिला कामगारांना महिला शोषण प्रतिबंधात्मकतेच्या उपाययोजनेची माहिती देऊन कायद्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

दिलासा सेलच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उबरहंडे-देशमुख यांनी, महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना जागरूक राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर संवाद साधू नये. कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास पोलिसांशी संपर्क साधवा. चुकीच्या गोष्टीला वेळप्रसंगीच रोखल्यास पुढील धोका टाळता येतो. स्वत:चे संरक्षण करण्यासाठी महिलांनी जागरूक व सक्षम होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी महिलांचे आजार, गुप्तरोग, एच.आय.व्ही. एड‌्स याबद्दल माहिती देऊन हे आजार टाळण्यासाठी मार्गदर्शन केले. शारदा होशिंग यांनी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील बेवारस, निराधार मनोरुग्ण असलेल्या महिलांचे संगोपन करून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली.

अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ म्हणाले की, स्त्री हे शक्तीचे प्रतीक आहे. समाजाच्या उद्धारकर्त्या या महिलाच असून, त्यांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. स्थलांतरित महिला कामगार अशिक्षित असल्याने त्यांच्यावर अन्याय झाला तरी त्या सहन करतात. त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्नायडर इलेक्ट्रिक इंडियाच्या दीपाली टकले, एमसीसीआयएचे व्यवस्थापक प्रदीपजी बागूल, अरणगावचे उपसरपंच महेश पवार, आदींसह कामगार महिला उपस्थित होत्या.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख, अमृतदीप प्रकल्पाचे व्यवस्थापक नम्रता नागरगोजे, समुपदेशक पल्लवी हिवाळे-तुपे, लेखाधिकारी श्रीकांत शिरसाट, क्षेत्रीय अधिकारी विकास बर्डे, अनिल दुधवडे, ऋतिक बर्डे, मच्छिंद्र दुधवडे यांनी परिश्रम घेतले.

------------

Web Title: Women should be able to protect themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.