महिला, शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: September 7, 2016 00:37 IST2016-09-07T00:32:40+5:302016-09-07T00:37:13+5:30
शेवगाव : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळास कंटाळून नवविवाहितेने जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला.

महिला, शेतकऱ्याची आत्महत्या
शेवगाव : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळास कंटाळून नवविवाहितेने जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा पती, सासरे व सासू यांच्याविरूद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामपूर (ता. श्रीरामपूर) येथील श्रीरंग नाथू उफाळकर यांची मुलगी रोहिणी (वय १९) हिचा चार महिन्यांपूर्वी १७ एप्रिल २०१६ रोजी दहीगावने (ता. शेवगाव) येथील रोहिदास भानुदास गुंजाळ याच्याशी विवाह झाला.
माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी पैसे आणण्याच्या कारणावरुन तिचा सासरी वेळोवेळी छळ होत असल्याची माहिती तिने आपल्या वडिलांना दिली होती.
३ दिवसांपूर्वी माहेरच्या मंडळींनी तिला दहिगाव-ने येथे सासरी आणून सोडले. तेव्हा पैसे आणल्याशिवाय घरात येऊ नको, असा दम तिला पती, सासू, सासऱ्यांनी भरला.
या सततच्या त्रासाला कंटाळून तिने जाळून घेतले. यात तिचा मृत्यू झाल्याने तिच्या वडिलांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मयत रोहिणीचा पती रोहिदास, सासरा भानुदास नरसू गुंजाळ, सासू सुशिला भानुदास गुंजाळ (सर्व रा. गुंजाळ वस्ती, दहीगाव ने) यांच्याविरोधात भादंवि कलम ४९८ (अ), ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय राऊत तपास करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असलातरी अद्याप कुणालाही अटक नाही. (तालुका प्रतिनिधी)
\मांजरी : राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील शेतकरी सहादु भाऊसाहेब शेरकर (वय ४१) यांनी कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपविली़ डाळिंबाची बाग दुष्काळाने उद्ध्वस्त झाल्याने शेरकर यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे़सहादू शेरकर यांनी कडक उन्हाळयात टँकरव्दारे डाळिंबाला पाणी घालवून बाग वाचविण्याचा प्रयत्न केला़ मात्र गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाने पिच्छा पुरविल्याने गणित कोलमडले़ डाळिंब शेतीसाठी साडेतीन लाख रूपये खर्च के ला़ मात्र डाळिंबाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने शेरकर यांनी मृत्युचा मार्ग स्वीकारला़ शेरकर यांनी एका सहकारी सोसायटीकडून एक लाख तर औषधासाठी सव्वालाख रूपये कर्ज घेतले होते़ डाळिंबावर कर्ज फे डण्याचे नियोजन होते़ मात्र कर्ज फिटणे शक्य नसल्याने शेरकर यांनी विषारी औषध घेणे पसंत केले़ मयत सहादु शेरकर यांच्या मुलीचा पुढील महिन्यात विवाह होणार असताना अचानक घडलेल्या घटनेने मुसळवाडी परिसरात हळहळ व्यक्तकरण्यात येत आहे़ शेरकर यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ असा परिवार आहे़