महिलांनी गोवऱ्यावर केला स्वयंपाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:19 IST2021-02-07T04:19:13+5:302021-02-07T04:19:13+5:30

अहमदनगर : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वसामान्य गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. कोरोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक ...

The women cooked on gourds | महिलांनी गोवऱ्यावर केला स्वयंपाक

महिलांनी गोवऱ्यावर केला स्वयंपाक

अहमदनगर : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वसामान्य गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. कोरोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक हाल झाले आहे. त्यातच या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हा संताप व्यक्त करण्यासाठी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक करून आंदोलन केले.

अहमदनगर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा अध्यक्ष रेश्मा आठरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी युवती शहर अध्यक्षा अंजली आव्हाड, अपर्णा पालवे, सुनंदा कांबळे, वैशाली गुंड, सुनिता पाचारणे, किरण कटारिया, सायेरा शेख, उषा सोनटक्के, लता गायकवाड, शीतल राऊत, प्रीती संचेती, वैशाली भापकर, शोभा तांदळे, अर्चना केदारी, अलिशा गर्जे, शीतल गाडे, विमल पाचरणे आदी उपस्थित होत्या.

-----------

Web Title: The women cooked on gourds