कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:34 IST2020-12-14T04:34:40+5:302020-12-14T04:34:40+5:30
जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील बसस्थानकाजवळ गावी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असलेल्या एका महिलेस लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून ...

कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला लुटले
जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील बसस्थानकाजवळ गावी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असलेल्या एका महिलेस लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून तिच्या गळ्यातील दागिन्यांसह ६४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि.७) सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याबाबतचा गुन्हा रविवारी (दि.१३) जामखेड पोलीस ठाण्यात दाखल झाला.
फिर्यादी महिला सोमवारी (दि.७) सायंकाळी साडेसहा वाजता आपल्या भूम तालुक्यातील नळेवडगाव येथे जाण्यासाठी खर्डा बसस्थानकाजवळ वाहनाची वाट पाहत होती. यावेळी एकजण तेथे कार घेऊन आला. त्याने महिलेस गावी जाण्यासाठी लिफ्ट दिली. वाहन पुढे खर्डा किल्ल्याजवळ थांबविले. तेथे आणखी चार अनोळखी व्यक्ती कारमध्ये बसले. कार सुुरू होताच चालकाने मोठ्या आवाजात गाण्यांचा आवाज वाढविला. त्यावेळी महिलेने आरडाओरड केली. त्यांच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने महिलेचे तोंड दाबले. तर इतर दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कापून घेतले. तिच्या पर्समध्ये असलेले तीन हजार रुपये व मोबाईल बळजबरीने काढून घेतला. असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला व महिलेला साेडून दिले. महिलेच्या फिर्यादीवरून पाच अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला.