महिलेचा केला अवैधरित्या गर्भपात, डॉक्टरला झाली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 10:11 IST2020-06-23T10:10:16+5:302020-06-23T10:11:09+5:30

अहमदनगर: नगर तालुक्यातील जखणगाव येथे महिलेचा अवैधरित्या गर्भपात करणार्‍या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

Woman aborted illegally, doctor arrested | महिलेचा केला अवैधरित्या गर्भपात, डॉक्टरला झाली अटक

महिलेचा केला अवैधरित्या गर्भपात, डॉक्टरला झाली अटक

अहमदनगर: नगर तालुक्यातील जखणगाव येथे महिलेचा अवैधरित्या गर्भपात करणार्‍या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

 शंकरप्रसाद दिगंबर गंधे (वय 50) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा अवैधरित्या गर्भपात केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. माहितीनुसार पोलीस पथक सोमवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी एक महिला त्या ठिकाणी आढळून आली. पोलिसांनी अधिक चौकशी करत या घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना माहिती दिली. डॉ. मुरंबीकर यांनी पथकासह हॉस्पिटलमध्ये येऊन पाहणी केली तेव्हा सदर महिलेचा डॉ. गंधे याने अवैधरित्या गर्भपात केला असल्याचे समोर आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नगर तालुका पोलिसांनी डॉक्टर गंधे याला अटक करत त्याच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Woman aborted illegally, doctor arrested