मृतावस्थेत आढळला लांडगा; वनविभागाकडून तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 11:49 IST2020-12-01T11:48:48+5:302020-12-01T11:49:27+5:30
खांडवी येथे संत तुकाराम विद्यालय शाळेच्या प्रांगणात लांडगा मृत अवस्थेत आढळून आला आहे. या लांडग्यावर बिबट्याने हल्ला केला का इतर कोणी? याचा तपास वनविभाग करत आहे. खांडवी शेजारीलच कुसडगाव येथे दोन दिवसापूर्वी वन्यप्राणी तरसाने बैलावर हल्ला करून जखमी केले होते.

मृतावस्थेत आढळला लांडगा; वनविभागाकडून तपास सुरू
जामखेड : तालुक्यात खांडवी येथे संत तुकाराम विद्यालय शाळेच्या प्रांगणात लांडगा मृत अवस्थेत आढळून आला आहे. या लांडग्यावर बिबट्याने हल्ला केला का इतर कोणी? याचा तपास वनविभाग करत आहे. खांडवी शेजारीलच कुसडगाव येथे दोन दिवसापूर्वी वन्यप्राणी तरसाने बैलावर हल्ला करून जखमी केले होते.
खांडवी रस्त्यालगत संत तुकाराम महाराज विद्यालय आहे. याठिकाणी सोमवारी दुपारी अडीच वाजता विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर सायंकाळी तेथील आवराआवर होऊन तेथे कोणी नव्हते. सकाळी सातच्या सुमारास खांडवीचे माजी सरपंच नरेंद्र जाधव हे संत तुकाराम विद्यालयात गेले असता तेथे एक लांडगा मृत अवस्थेत आढळून आला.
याबाबतची माहिती तातडीने खांडवीचे माजी सरपंच नरेंद्र जाधव यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना कळवली. त्यांनी वनविभागाचे अधिकारी गणेश छबीलवाड यांना माहिती दिली. याबाबत वनविभाग त्या दृष्टीने तपास करत आहे.