शेवगावमध्ये वादळी पाऊस
By Admin | Updated: June 4, 2014 00:13 IST2014-06-03T23:59:06+5:302014-06-04T00:13:15+5:30
शेवगाव : तालुक्यातील सामनगाव, भातकुडगाव, दहिगाव-ने, देवटाकळी, लोळेगाव, हिंगणगावने, खामगाव, जोहरापूरसह काही गावांना सोमवारी रात्री वादळी वार्यासह झालेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले.
शेवगावमध्ये वादळी पाऊस
शेवगाव : तालुक्यातील सामनगाव, भातकुडगाव, दहिगाव-ने, देवटाकळी, लोळेगाव, हिंगणगावने, खामगाव, जोहरापूरसह काही गावांना सोमवारी रात्री वादळी वार्यासह झालेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले. रोहिणी नक्षत्रातील या पहिल्या पावसाने अनेकांच्या घरावरील तसेच शेती, वस्ती व जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. देवटाकळी येथे हरिनाम सप्ताह व शिवचरित्रावरील व्याख्यानमालेसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठासह मंडपाचेही या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. सध्या उन्हाचा पारा काही प्रमाणात खाली आला असला तरी ढगाळ वातावरणामुळे दमटपणा वाढला आहे. त्यातच विजेच्या विक्रमी नियमित भारनियमनास तातडीच्या भारनियमनाचाही तडाखा बसत असून, बर्याच वेळा दीर्घकाळ वीज पुरवठा बंद राहिल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)