शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST

पावसाचा अंदाज दिसल्यास कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. कांदा लागवडीपासूनच या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. कांदा काढणीला ...

पावसाचा अंदाज दिसल्यास कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. कांदा लागवडीपासूनच या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. कांदा काढणीला आला तरी वातावरण शेतकऱ्यांना साथ देत नाही. त्यातच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रंग दाखवायला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. तालुक्यात सर्वच भागात कांदा काढणीचे काम सुरू आहे. काढलेला कांदा गोळा करून शेतातच ठेवलेला आहे. वादळी वारे व अवकाळी पावसाचा अंदाज दिसला की कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसत आहे.

कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. लागवड झालेल्या कांदा रोपाला सततच्या पावसाने फटका बसल्याने शेतकऱ्यांना दुबार कांदा लागवड करावी लागली. महागडे कांदा बियाणे, मजुरी, खते आणि फवारणीसाठी महागडी औषधे यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे. कांदा विक्रीतून मोठे उत्पादन मिळेल, अशी आशा निर्माण झाली असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरविले आहे.

अवकाळी पावसामुळे काढणी केलेला कांदा शेतातच भिजत असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा

फटका बसणार आहे.

वादळी वाऱ्यासह होणाऱ्या अवकाळी पावसाने चारा पिकांचे नुकसान होत आहे. वादळी वाऱ्याने कडवळ, मका भुईसपाट होत आहे. तालुक्यात बहुतांशी भागात गव्हाचे खळे झाले आहे. गव्हाचा भुसा शेतातच पडलेला आहे.

............

कांदा लागवडीसाठी महागडे बी टाकून रोपे तयार केली. पण सततच्या पावसाने कांदा रोपे जागेवर सडली. त्यामुळे महागडी रोपे व बियाणे घेऊन कांदा लागवड केली. सुरुवातीपासून वातावरणात बदल होताना पिकांवर काढणीपर्यंत महागडी औषधे फवारणी करावी लागली. सध्या काढणी केलेल्या कांद्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.

- तुकाराम लांडगे , शेतकरी, सारोळा बध्दी

फोटो केडगाव

: अवकाळी पावसामुळे काढणी झालेला कांदा झाकण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.