शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सुजय विखे भाजपाच्या तिकीटावर लोकसभा लढविणार? कर्डिलेंच्या आॅफरला राधाकृष्ण विखेंनी दिला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 13:53 IST

सुजय विखेंनी तात्काळ भाजपात प्रवेश करावा, अशी जाहीर आॅफर आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. त्यावर राधाकृष्ण विखेंनी तुमच्या चांगल्या कामास आमचा पाठिंबा राहिल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे सुजय विखे भाजपात प्रवेश करुन पुढील लोकसभा लढविणार का, या नव्या चर्चेला आता तोंड फुटले आहे.

अहमदनगर : सध्या भाजपामध्ये प्रवेशासाठी उंची, वजन अशी कोणतीही अट नाही. त्यामुळे डॉ. सुजय विखेंना भाजपात सहज प्रवेश मिळेल आणि पुढील खासदारकीही सोपी जाईल. त्यामुळे सुजय विखेंनी तात्काळ भाजपात प्रवेश करावा, अशी जाहीर आॅफर आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. त्यावर राधाकृष्ण विखेंनी तुमच्या चांगल्या कामास आमचा पाठिंबा राहिल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे सुजय विखे भाजपात प्रवेश करुन पुढील लोकसभा लढविणार का, या नव्या चर्चेला आता तोंड फुटले आहे.राहुरी येथे शनिवारी तनपुरे कारखान्याच्या गाळप हंगामात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुजय विखे हे एकाच व्यासपीठावर आले. त्यावेळी आमदार कर्डिले यांनी डॉ़ सुजय विखे यांचे तोंडभरुन कौतुक करीत त्यांनी भाजपात यावे, असे जाहीर निमंत्रणच दिले.राधाकृष्ण विखे यांचे पुत्र व विखे कारखान्याचे अध्यक्ष सुजय विखे हे नगर दक्षिणेतून पुढील लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कर्डिलेंच्या आॅफरला महत्व आले आहे. कर्डिले म्हणाले, गुजरातमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तुम्ही आत्ताच भाजपात या. तुमचे खासदारकीचे काम सोपे होईल. तुम्ही भाजप प्रवेशाला वेळ केला तर पुढचे काही सांगता येत नाही. सध्या भाजपात प्रवेश देताना उंची, वजन असे काहीही पाहिले जात नाही. धडाधड प्रवेश दिला जातो. त्यामुळे तुमचा प्रवेश लगेच होईल. पुढे कदाचित तुमचा प्रवेश अवघड होईल, अशा शब्दात कर्डिले यांनी सुजय विखेंना भाजपाचे निमंत्रण दिले. ते ऐकून सुजय विखेंच्या चेह-यावरही हसू फुलले.कर्डिले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विखे म्हणाले, शिवाजीराव व सुजय यांनी राहुरी कारखाना चालू करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. दोघांचे चांगले जमतेही. दोघांचेही काम चांगले आहे. असेच एकत्र राहून तुम्ही पुढेही चांगले काम करणार असाल तुमच्या चांगल्या कामास आमचा पाठिंबा आहे, अशा शब्दात राधाकृष्ण विखे यांनी कर्डिलेंच्या आॅफरला ग्रीन सिग्नल दिला. त्याचे उपस्थितांनीही टाळ्या वाजवून स्वागत केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेSujay Vikheसुजय विखेBJPभाजपाcongressकाँग्रेस