शिष्यवृत्ती'साठी साडेतीन हजार शिक्षकांची होणार नेमणूक
By Admin | Updated: March 2, 2015 13:14 IST2015-03-02T13:14:37+5:302015-03-02T13:14:37+5:30
चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २२ मार्चला होणार असून यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने युध्द पातळीवर तयारी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

शिष्यवृत्ती'साठी साडेतीन हजार शिक्षकांची होणार नेमणूक
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २२ मार्चला होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने युध्द पातळीवर तयारी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. यंदा या परीक्षेचे पर्यवेक्षण माध्यमिक शिक्षकांनी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत. यामुळे परीक्षेसाठी साडेतीन हजार माध्यमिक शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. ■ परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत येणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण चांगले आहे. मात्र, हेच प्रमाण राज्य गुणवत्ता यादीत वाढविण्यासाठी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या माध्यामातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जास्तीतजास्त गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांच्या दोन सराव परीक्षा घेण्यात आल्या असून वेळ मिळाल्यास तिसरीही सराव परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे. |