पत्नीचा खून;पतीस जन्मठेप
By Admin | Updated: July 11, 2014 00:55 IST2014-07-11T00:27:32+5:302014-07-11T00:55:56+5:30
कोपरगाव : राहाता तालुक्यातील नांदुर्खी येथील विवाहितेस जीवंत जाळल्याप्रकरणी पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱए़ गायकवाड यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़

पत्नीचा खून;पतीस जन्मठेप
कोपरगाव : राहाता तालुक्यातील नांदुर्खी येथील विवाहितेस जीवंत जाळल्याप्रकरणी पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱए़ गायकवाड यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़
नांदुर्खी येथे २२ एप्रिल २००७ रोजी रात्री वाल्मिक पंढरीनाथ दाभाडे याने पत्नी सुनीता हिस कोपीसह पेटवून दिले़ या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंंतर दोषारोपपत्र कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाले़
या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले़ यामध्ये आरोपीची मुलगी ज्योती व शेजारी राहणारा राजेंद्र दाभाडे हे दोन साक्षीदार फितूर झाले़ म्हणून सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील पी़ सी़ धाडीवाल यांनी त्यांची उलटतपासणी घेतला़ सदर चौकशीमध्ये आलेल्या संपूर्ण तोंडी व कागदोपत्री पुराव्यामध्ये आरोपीविरूद्ध महत्वाचा पुरावा न्यायालयासमोर आला़ सदर पुराव्यामध्ये मयत सुनीता हिचा मृत्यूपूर्व जबाब महत्वाचा ठरला़
जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ ए़ गायकवाड यांनी सदर गुन्ह्यातील आलेल्या पुराव्यांची शहानिशा करून व उभय पक्षकारांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याचे जाहीर केले़ आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावून ५० हजार रूपये दंड ठोठावण्यात आला़ दंड न भरल्यास दोन वर्षांची शिक्षाही सुनावली़ आरोपीने दंड भरला तर सदर दंडातील रकमेपैकी ४५ हजार रूपये आरोपीच्या मुलांच्या पालन पोषणासाठी आजी सुनंदा शिवनाथ गुंजाळ यांच्याकडे देण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले़ सरकार पक्षातर्फे अॅड़ पी़सी़ धाडीवाल यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)