काम देता का काम, रोजगारासाठी १३ हजार जणांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:34+5:302021-09-09T04:26:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. व्यवसाय बंद झाले असून, गेल्या वर्षभरात ...

काम देता का काम, रोजगारासाठी १३ हजार जणांची नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. व्यवसाय बंद झाले असून, गेल्या वर्षभरात १३ हजार २६२ जणांनी स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली आहे.
कोरोनामुळे नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत. गेल्या दोन वर्षांत नवीन रोजगार उपलब्ध तर झालेच नाहीत. उलटपक्षी अनेकांचे रोजगार गेले. रोजगारासाठी युवक - युवतींनी स्वयंरोजगार कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत नोंदणी करणाऱ्यांची संख्या १३ हजार २६२ इतकी आहे. तसेच स्वयंरोजगारासाठी येथील जिल्हा उद्योग केंद्रातील अनेक प्रकरणे दाखल झाली आहेत. लॉकडाऊननंतर स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांकडे तरुणांचा कल आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील अनेक नवीन व्यवसाय सुरू झालेले पाहायला मिळतात. यामध्ये हॉटेल, बेकर्स, बांधकाम साहित्य, चहा व ड्रायफ्रुट्सचा समावेश आहे.
.....
अशी झाली नोंदणी
जानेवारी- २,११७
फेब्रुवारी-२,०३९
मार्च-१,९६०
एप्रिल-७८६
मे-५३३
जून-२,५०९
जुलै-२,१४२
ऑगस्ट-१,०७६
.....
ऑगस्टखेर एकूण नोंदणी
२,२३,१११
....