मोफत धान्य कधी मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:30+5:302021-04-30T04:25:30+5:30
अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा करताना गोर-गरीब, गरजूंना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. ...

मोफत धान्य कधी मिळणार ?
अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा करताना गोर-गरीब, गरजूंना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. मात्र, लॉकडाऊन सुरू होऊन १५ दिवस झाले तरी अद्याप लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळाले नाही. एप्रिलमध्ये जे उपलब्ध आहे, ते विकतचे धान्य घ्या. मे महिन्यात मोफतचे धान्य वाटप होईल. असे पुरवठा विभागाने नियोजन केले आहे. त्यामुळे गोर-गरिबांना लॉकडाऊनमध्ये मिळणार की लॉकडाऊन संपल्यानंतर मोफत धान्य मिळणार याची ग्रामीण भागात प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्र सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमुळे कामगार, मजूर, गोर-गरीब, मजूर यांचे हाल होणार नाहीत. त्यांना काम नसल्याने त्यांना आधार म्हणून एक महिन्याचे धान्य मोफत देण्याची घोषणा केली. मात्र, पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानावर जे उपलब्ध धान्य आहे, तेच धान्य वाटप करण्याचा आदेश दिला. त्यानुसार जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना मका, ज्वारी, गहू, तांदळाचे वाटप सुरू आहे. ज्या लाभार्थ्यांना धान्य विकत दिले जाते, त्या लाभार्थ्यांनी एप्रिलमध्येही धान्य विकत घ्यायचे आहे, असा आदेश पुरवठा विभागाने दिला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये धान्य घेण्यासाठी पैसे आणायचे कोठून? असा सवाल लाभार्थी करीत आहेत.
-----------
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा ?
संचारबंदीमुळे हातचा रोजगार बुडत आहे. मोफत धान्य देण्याची घोषणा झाली असली तरी जवळपास दोन महिने होत आले तरी अद्याप कोणतेच रेशन मिळाले नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे?
- सखुबाई तेलोरे, ढगे वस्ती
------------
संचारबंदीच्या निर्णयामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मजुरीचे कामही लागत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा? घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे.
- एकनाथ थोरात, बेल्हेकरवाडी
-----------
मोफत धान्य देण्याची घोषणा होऊन पंधरा दिवस होत आले आहेत. तसेच संचारबंदीची मुदतही संपत आली आहे. तरी अद्याप मोफत धान्य मिळाले नाही. घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
-योगेश पंडित, सोनई---------
संचारबंदीमुळे हातचा रोजगार बुडत आहे. मोफत धान्य देण्याची घोषणा झाली असली तरी जवळपास दोन महिने होत आले तरी रेशन मिळाले नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे?
- सहादु देवकर, श्रीगोंदा
संचारबंदीच्या निर्णयामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मजुरीचे कामही लागत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा? घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे.
- अश्रू डोके, आढळगाव
-------------
सध्या जे उपलब्ध धान्य आहे, त्याचे वाटप नियमित सुरू आहे. जे मोफत धान्य आहे, ते पुढील महिन्यात मिळणार आहे. दोन महिन्यांचे धान्य एकाचवेळी घेतले तरी त्यापैकी एका महिन्याचे पैसे द्यायचे आणि दुसऱ्या महिन्याचे मोफत धान्य आहे. सध्या एप्रिल महिन्याचे वितरण सुरू असून लॉकडाऊन असला तरी धान्य वितरण सुरळीत आहे.
-जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी
---
डमी
रेशनकार्ड
२७ फ्री रेशन डमी