वेळ पडल्यास भंडारदऱ्याचे चाक बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:37+5:302021-08-12T04:25:37+5:30

पिचड म्हणाले, राघोजी हे स्वातंत्र्याचा पाया उभा करण्यासाठी सतत इंग्रजी सत्तेविरुद्ध लढले. ज्यांना ठाण्याच्या कारागृहात फाशी जाताना मला क्रांतिकारकाचाच ...

When the time comes, we will turn off the wheel | वेळ पडल्यास भंडारदऱ्याचे चाक बंद करू

वेळ पडल्यास भंडारदऱ्याचे चाक बंद करू

पिचड म्हणाले, राघोजी हे स्वातंत्र्याचा पाया उभा करण्यासाठी सतत इंग्रजी सत्तेविरुद्ध लढले. ज्यांना ठाण्याच्या कारागृहात फाशी जाताना मला क्रांतिकारकाचाच मृत्यू द्या, अशी गर्जना त्यांनी केली होती. इंग्रजी सत्तेच्या जंगल, जमीन कर व बेलगाम सावकारी पिळवणुकीविरुद्ध ते लढले. राघोजी आदिवासी बांधवांसह सर्व जातीधर्माच्या जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढले. त्यांचे नाव देण्याची मागणी गैर आहे काय ? माझ्या कुटुंबातील कुणाचे नाव देण्याची ही मागणी नाही. ही मागणी सर्व समाजातील जनतेची आहे. डाॅ. गोविंद गारे व मी राघोजी यांचा इतिहास शोधून सर्व इंग्रजकालीन दस्तऐवजांच्या आधारे ते आद्य क्रांतिकारक असल्याचे सिद्ध केले. ठाणे कारागृहाला राघोजींचे नाव, तर देवगावात स्मारक करताना आपण काय करीत होता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज भंडारदरा धरणावर संगमनेर, लोणीचे राजकारण आणि अर्थकारण चालते. थोरात, विखे हेही सरकारकडे धरणाला राघोजींचे नाव देण्याची रीतसर मागणी करतील.

Web Title: When the time comes, we will turn off the wheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.