गृहराज्यमंत्री असताना मलाच दमदाटी झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:51 IST2021-01-13T04:51:48+5:302021-01-13T04:51:48+5:30
कर्जत : मी गेल्या दहा वर्षांत कोणाला दमदाटी केली नाही. उलट मी गृहराज्यमंत्री होतो तेव्हा मलाच दमदाटी व्हायची, असा ...

गृहराज्यमंत्री असताना मलाच दमदाटी झाली
कर्जत : मी गेल्या दहा वर्षांत कोणाला दमदाटी केली नाही. उलट मी गृहराज्यमंत्री होतो तेव्हा मलाच दमदाटी व्हायची, असा खळबळजनक खुलासा माजी मंत्री राम शिंदे यांनी जोगेश्वरवाडी येथे केला.
कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडून दमदाटी होत असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना राम शिंदे यांनी हा खुलासा केला आहे. जोगेश्वरवाडी येथे एका कार्यक्रमात शिंदे बोलत होते. ते म्हणाले, राजकारणात हार-जीत होतच असते. आपण पदापेक्षा सर्वसामान्यांना महत्व देतो. नवे पर्व आणि विसरा सर्व अशी आता तालुक्यात परिस्थिती आहे, अशा शब्दात पवार यांच्यावर टीका करीत राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायतीत भाजपची सत्ता येणार आहे, असा दावा केला. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, नगरसेविका उषा राऊत, हर्षदा काळदाते, वृषाली पाटील, राणी गदादे, ज्योती शेळके, आजीनाथ कचरे, काका धांडे, अल्लउद्दीन काझी, स्वप्नील देसाई, पप्पू धोदाड, गणेश पालवे, अमृत काळदाते, अनिल गदादे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दादा शिंदे यांनी केले.
......................
कर्जतचा पाणी आम्हीच सोडवला - राऊत
नगरपंचायतच्या माध्यमातून कर्जत शहराचा स्वप्नवत विकास साधला आहे. अत्यंत जटिल असा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासह अनेक समस्या
माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नातून सोडविल्या आहेत. साधलेला सर्वांगीण विकास लोकांच्या समोर आहे. त्यामुळे नगरपंचायतीत पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, असे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले.
..............
११ राम शिंदे
जोगेश्वरवाडी येथे बोलताना माजी मंत्री राम शिंदे. व्यासपीठावर नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेविका निता कचरे, सचिन पोटरे, स्वप्नील देसाई आदी.