व्हाॅट्सॲप ग्रुपमुळे खरेदी - विक्रीला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:22 IST2021-03-10T04:22:31+5:302021-03-10T04:22:31+5:30
तब्बल १७५ व्हाॅट्सॲप ग्रुप तयार झाल्याने लाखो शेतकरी यात जोडले गेले आहेत. या व्हाॅट्सॲप ग्रुपमुळे खरेदी - विक्रीला चालना ...

व्हाॅट्सॲप ग्रुपमुळे खरेदी - विक्रीला चालना
तब्बल १७५ व्हाॅट्सॲप ग्रुप तयार झाल्याने लाखो शेतकरी यात जोडले गेले आहेत. या व्हाॅट्सॲप ग्रुपमुळे खरेदी - विक्रीला चालना मिळाली. ग्रुप ॲडमिन राजेंद्र औताडे, सागर रोहमारे, बाळासाहेब औताडे, नितीन पाचोरे, शिवाजी खरात, महेश औटी, नवनाथ गुडघे यांनी एकत्र येत पोहेगाव कृषी मार्केट व्हाॅट्सॲप ग्रुपची निर्मिती केली. शेतकरी व अनेक खरेदी - विक्री करणाऱ्या नागरिकांनी याला प्रतिसाद दिल्यामुळे आज तब्बल १७५ व्हाॅट्सॲप ग्रुप निर्माण केले. या ग्रुपमध्ये तब्बल एक लाख शेतकरी आणि व्यापारी जॉईन झाले आहेत. अहमदनगर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, धुळे
आदी जिल्ह्यातून या ग्रुपला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी घरबसल्या आपल्या मालाची किंमत ठरवतो. आपल्याला परवडेल अशा किमतीत तो काहीही विकतो. कुठल्याही प्रकारचे कमिशन खरेदी - विक्री करणाऱ्या शेतकऱ्याकडून किंवा व्यापाऱ्याकडून घेतले जात नाही, असा खुलासाही पोहेगाव कृषी मार्केट ग्रुपच्या वतीने करण्यात आला आहे.