..ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचविणार : लंके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:48+5:302021-07-14T04:23:48+5:30
पारनेर : स्वतःच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनातून वाचवू शकले नाहीत, ते सर्वसामान्यांना कसे वाचविणार. कोरोना संकट काळात दोन वर्षे बिळात ...

..ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचविणार : लंके
पारनेर : स्वतःच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनातून वाचवू शकले नाहीत, ते सर्वसामान्यांना कसे वाचविणार. कोरोना संकट काळात दोन वर्षे बिळात होते. त्यांना उत्तर द्यायचीही गरज नाही, अशा शब्दांत आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांच्यावर नाव न घेता टीका केली.
रविवारी करंदी (ता. पारनेर) येथील कार्यक्रमात लंके बोलत होते.
माजी आमदार औटी यांनी केलेल्या टीकेला लंके यांनीही प्रथमच औटी यांचे नाव न घेता खरमरीत उत्तर दिले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांच्यासह आत्मा समितीचे अध्यक्ष ॲड. राहुल झावरे, मारुती रेपाळे, सरपंच नामदेव ठाणगे, किरण ठुबे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब ठाणगे, प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख जितेश सरडे, उपसरपंच सुनील चव्हाण, चंद्रभान ठुबे, अभयसिंह नांगरे, संदीप चौधरी, सत्यम निमसे, लखन ठाणगे, शरद गोरे, महेंद्र गायकवाड, शारदा गांगड, सोनाली चौधरी, मंगल चौधरी, मनीषा ठाणगे, जितेंद्र उघडे, सुनीता औटी, सुनील ठाणगे, भाऊसाहेब पिंपरकर, आदी उपस्थित होते.
लंके म्हणाले, कोरोना संकट काळात जे दोन वर्षे बिळात लपून बसले होते ते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. माझा पिंड काम करण्याचा आहे. मी कामातच राम मानणारा आहे. कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये उभारलेल्या कोविड उपचार केंद्रात तब्बल १७ हजार १०० रुग्ण कोरोनामुक्त झाले.
----
झावरेंची खंबीर साथ..
लंके म्हणाले, मी राजकारणात आल्यापासून प्रस्थापितांनी मला कधीच स्वीकारले नाही. माझ्या वाट्याला कायम संघर्ष आला. या पार्श्वभूमीवर माजी आमदार नंदकुमार झावरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कारण त्यांनीही प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला आहे. प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माजी सभापती राहुल झावरेही काम करीत असल्याचे लंके यांनी सांगितले.