जिल्ह्याला आणखी मंत्रीपद मिळाल्यास स्वागतच : राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:03 IST2019-06-15T16:01:35+5:302019-06-15T16:03:03+5:30
उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या विस्तारात नगर जिल्ह्याला आणखी मंत्रिपद मिळाल्यास स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्ह्याला आणखी मंत्रीपद मिळाल्यास स्वागतच : राम शिंदे
अहमदनगर : उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या विस्तारात नगर जिल्ह्याला आणखी मंत्रिपद मिळाल्यास स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश होणार असल्याची शक्यता आहे. याबाबत पालकमंत्री शिंदे यांना विचारले असता त्यांनी जिल्ह्याला आणखी मंत्री पद मिळत असतील तर स्वागतच आहे. जिल्ह्याच्या विकासकामांसाठी त्याची मदतच होईल.
आपले नाव भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत असल्याचे नाकारत नाही. मंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्षपद पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. दक्षिणेचा खासदार उत्तरेत अन उत्तरेचा खासदार दक्षिणेत आल्यामुळे आता जिल्हा विभाजन होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.