नियम धाब्यावर बसवून भिंगारमध्ये भरला आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 14:43 IST2021-04-09T14:43:39+5:302021-04-09T14:43:49+5:30
प्रशासनाने आठवडे बाजारावर बंदी आणली असूनही भिंगारमध्ये आठवडा बाजार भरविण्यात आला. यामुळे बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

नियम धाब्यावर बसवून भिंगारमध्ये भरला आठवडे बाजार
भिंगार : प्रशासनाने आठवडे बाजारावर बंदी आणली असूनही भिंगारमध्ये आठवडा बाजार भरविण्यात आला. यामुळे बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सर्रासपणे नियमाचे उल्लंघन होत आहे. सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाला आहे. बाजार भरवणारे विक्रेत्यांवर कारवाई करणार कोण? या गर्दीमुळे येथील रस्त्यावर वाहतूक कोंडी सुद्धा जास्त जास्त प्रमाणावर होत आहे. भिंगार पोलिस प्रशासन व वडारवाडी ग्रामपंचायतकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे.वडारवाडी ग्रामपंचायत व भिंगार पोलीस ठाणे नागरिकांवर कारवाई करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.