टाकळी खंडेश्वरीत शस्त्र, अंबर दिव्यासह गाडी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 13:50 IST2020-11-01T13:50:17+5:302020-11-01T13:50:17+5:30

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत शस्त्र, अंबर दिव्यासह गाडी (सफारी) ताब्यात घेतली. या प्रकरणी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी दत्तू सकट यास अटक केली.

Weapons seized in Takli Khandeshwari, vehicle with amber lamp seized | टाकळी खंडेश्वरीत शस्त्र, अंबर दिव्यासह गाडी जप्त

टाकळी खंडेश्वरीत शस्त्र, अंबर दिव्यासह गाडी जप्त

्जत : तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत शस्त्र, अंबर दिव्यासह गाडी (सफारी) ताब्यात घेतली. या प्रकरणी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी दत्तू सकट यास अटक केली. टाकळी खंडेश्वरी येथे एका इसमाने स्वतःच्या घरात दोन लोखंडी तलवारी व गाडीत अंबर दिवा लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी पोलीस पथकासह जाऊन दत्तू मुरलीधर संकट (रा. सपकाळ वस्ती, टाकळी खंडेश्वरी) यांच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून दोन तलवारी, सफारीतून केशरी रंगाचा अंबर दिवा एक टाटा सफारी (एम. एच. १६/ आर. ४८३३) जप्त केली आहे. तसेच त्याच्यावर शस्त्र बाळगणे, अंबर दिव्याचा गैरवापर यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पोलीस पथकात पोलीस गौतम फुंडे, केशव व्हरकटे, हृदय घोडके, सागर जंगम, आदित्य बेलेकर, गोवर्धन कदम, वैभव सुपेकर, दादाराम म्हस्के, रत्नमाला हराळे, मच्छिंद्र जाधव आणि संतोष साबळे आदींचा समावेश होता.

Web Title: Weapons seized in Takli Khandeshwari, vehicle with amber lamp seized