एल्गार मोर्चा वेळप्रसंगी दिल्लीपर्यंत नेऊ

By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:41+5:302020-12-05T04:36:41+5:30

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात अखिल भारतीय किसन संघर्ष समन्वय समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, ...

We will take the Elgar Morcha to Delhi on time | एल्गार मोर्चा वेळप्रसंगी दिल्लीपर्यंत नेऊ

एल्गार मोर्चा वेळप्रसंगी दिल्लीपर्यंत नेऊ

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात अखिल भारतीय किसन संघर्ष समन्वय समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, मार्क्सवादी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, विद्रोही विद्यार्थी संघटना, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शेतीमाल हातात घेऊन गुरुवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार लहामटे बोलत होते.

शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा तहसीलदार कार्यालयावर दुपारी धडकला. निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. आमदार लहामटे, साथी दशरथ सावंत, डॉ. अजित नवले, कारभारी उगले, दादा पाटील वाकचौरे, रामनाथ चौधरी, विनय सावंत, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, डॉ. संदीप कडलग, स्वप्नील धांडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. अनिकेत घुुुले, प्रियांका चासकर, शांताराम संगारे, भानुदास तिकांडे, विनोद हांडे, नामदेव भांगरे यांचीही भाषणे झाली. यावेळी भाऊसाहेब नवले, सोन्याबापू वाकचौरे, बाळासाहेब नाईकवाडी, राजेंद्र कुमकर, प्रदीप हासे, बाबासाहेब नाईकवाडी, नितीन नाईकवाडी, सुरेश नवले, महेश तिकांडे उपस्थित होते. स्वामिनाथन आयोग राज्यात लागू करावा, तसेच पंजाबसारखा शेतीमालाला हमीभाव मिळावा, असा कायदा व्हावा यासाठी विधानसभेत डॉ.लहामटे यांनी आवाज उठवावा, अशी मागणी दशरथ सावंत यांनी आपल्या भाषणातून केली.

( ०३अकोले)

Web Title: We will take the Elgar Morcha to Delhi on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.