शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

‘तनपुरे’ला गतवैभव मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 23:38 IST

राहुरी : डॉ.बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेला विजय हा सभासदांनी घडविलेल्या परिवर्तनाचा असून, या परिवर्तनातूनच तनपुरे कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे

राहुरी : डॉ.बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेला विजय हा सभासदांनी घडविलेल्या परिवर्तनाचा असून, या परिवर्तनातूनच तनपुरे कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे, असा निर्धार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला़
कारखाना कार्यस्थळावर आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विजयी संचालक आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आ. भाऊसाहेब कांबळे, जि. प. सदस्य सुभाष पाटील, डॉ. सुजय विखे, तान्हाजी धसाळ, सुरेशराव कर्पे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, हा कारखाना चालू करण्यासाठी ज्यांची एक रुपया आणण्याची दानत नव्हती, ते निवडणुकीत कोट्यवधी रुपयांच्या गोष्टी करीत होते. जी मुळा-प्रवरा संस्था बंद पडली, ती वाचविण्यासाठी हे कधी पुढे आले नाहीत. यांच्यावर लोकांचा विश्वास राहीला नाही. त्यामुळेच या निवडणुकीत सभासदांनी त्यांना धडा शिकविला. परिवर्तन घडवून एका चांगल्या कामाची सुरुवात सभासदांनी केली आहे. कामगारांनीही संयमीपणे या परिवर्तनात योगदान दिले. कार्यकर्त्यांनी १५ दिवस अहोरात्र मेहनत घेतली़ येणाऱ्या काळात हा कारखाना सुरु करण्याचा निर्धार करुन आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच राहुरी तालुक्याचे वैभव पुन्हा मिळवू, असा आशावाद विखे यांनी व्यक्त केला.
आता तुम्ही उसाची लागवड करा
आता अधिक वेळ न दवडता संचालक मंडळ कारखान्याची सूत्रे हातात घेणार आहे. लवकरात लवकर हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करू. तालुक्याच्या पाणी प्रश्नांबाबतही योग्य भूमिका घेवून तो सोडविण्याचा आपण प्रयत्न करू़ उसाची लागवड चांगल्या पध्दतीने करा. उसाच्या गाळपाची जबाबदारी मी घेतो़ सभासदांना चांगला भाव देण्याची तयारी आहे, असे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुजय विखे यांनी सांगितले़