उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:56+5:302021-05-17T04:19:56+5:30

खासदार राजीव सातव यांचे काम मी जवळून पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती ...

We lost a dedicated leader with a bright future | उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला

उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला

खासदार राजीव सातव यांचे काम मी जवळून पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती सदस्य ते खासदार प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना गरीब, कष्टकरी जनता, तरुण व शेतकऱ्यांचे प्रश्न ते अत्यंत तळमळीने मांडत असत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले. खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाची भूमिका ते भक्कमपणे मांडत असत. कृषी कायद्याला तीव्र विरोध करीत राज्यसभेत त्यांनी पक्षाची बाजू समर्थपणे मांडली. त्यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

......

काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत पाईक म्हणून राष्ट्रीय पातळीवर खासदार राजीव सातव यांनी मोठी जबाबदारी सांभाळली. खासदार सातव हे सातत्याने संगमनेरला विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहिले आहेत. विविध भाषांवर प्रभुत्व, उत्तम संघटन कौशल्य, प्रभावी वक्तृत्व, यामुळे त्यांनी पक्षातील अत्यंत महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मानाचे स्थान मिळविले होते. त्यांच्या आपत्कालीन निधनाने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असल्याची दु:खद भावना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली.

Web Title: We lost a dedicated leader with a bright future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.