आमचा जनतेवर विश्वास आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:25 IST2021-09-04T04:25:51+5:302021-09-04T04:25:51+5:30
भाजप पदाधिकारी प्रसाद ढोकरीकर व इतर दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावर विखे यांनी नगरपंचायत व नगरपरिषद ...

आमचा जनतेवर विश्वास आहे
भाजप पदाधिकारी प्रसाद ढोकरीकर व इतर दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावर विखे यांनी नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत जिल्हा बँकेची पुनरावृत्ती होईल, असे वक्तव्य केले होते. शुक्रवारी आमदार पवार खर्डा येथे आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखे यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, ते त्यांचे राजकीय वक्तव्य आहे. त्याकडे किती लक्ष द्यायचे हे आम्ही ठरवत असतो. जिल्हा बँकेची निवडणूक ठरावीक लोकांतून होत असते. त्यासाठी आवश्यक बांधणी करावी लागते. ‘हार ही हार’ असते. आता नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक जनतेतून होणार आहे. आमचा लोकांवर विश्वास आहे. लोकांच्या मनात काय आहे, हे लोकांत राहिल्याशिवाय कळत नाही. आमचा लोकांवर विश्वास आहे, असे पवार म्हणाले.