संशोधनाच्या जोरावर आपण महासत्तेकडे वाटचाल करू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:04+5:302021-09-12T04:25:04+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालय प्राचार्य म. वि. कौंंडिण्य विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ...

संशोधनाच्या जोरावर आपण महासत्तेकडे वाटचाल करू शकतो
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालय प्राचार्य म. वि. कौंंडिण्य विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय मालपाणी होते. प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशिलदार, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, संशोधन प्रकल्प समन्वयक डॉ. अशोक लिंबेकर, डॉ. वाल्मीक मेंढकर, प्रा. सागर श्रीमंदिलकर आदी उपस्थित होते
नवले म्हणाले, वेगवेगळ्या विषयावर संशोधन करणे आणि त्यातून नवनिर्मिती म्हणजे संशोधन. स्वावलंबी, समृद्ध जीवनासाठी त्याचबरोबर जागतिक बदलानुसार शिक्षणात बदल झाला पाहिजे. शरीर, बौद्धिकता आणि संस्कार हे संपत्तीचे प्रकार आहेत. आपल्यातील उणिवा ओळखून स्वतःला सक्षम बनवता आले पाहिजे, अशा पद्धतीच्या शिक्षणाची गरज युवा पिढीला आहे. प्राचार्य म. वि. कौंंडिण्य स्मृती चतुरस्त्र विद्यार्थी पुरस्कारासाठी माजी विद्यार्थी रमेश गुणे आणि भक्तिगीत गायक शामसुंदरजी भेडा स्मृती पुरस्कार व माजी विद्यार्थी डॉ. राजेशजी भेडा दिव्य-दिव्यांग पुरस्कारासाठी डॉ. राजेश भेडा यांनी आर्थिक योगदान दिले. प्रा. डॉ. राजेश्वरी ओझा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. डॉ. अशोक लिंबेकर यांनी आभार मानले.