आम्ही डॉन आहोत, हप्ता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:53+5:302021-03-22T04:18:53+5:30

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अक्षय राजेंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, सुरज साठे, ...

We are Don, pay the installment | आम्ही डॉन आहोत, हप्ता द्या

आम्ही डॉन आहोत, हप्ता द्या

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अक्षय राजेंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, सुरज साठे, राहुल झेंडे, मयूर चावरे, अक्षय (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. सिद्धार्थनगर) यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अक्षय जाधव यांचे बालिकाश्रम रोडवरील जाधव मळा परिसरात कापड दुकान आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीतून आलेले गुंड हातात लाकडी दांडे घेऊन जाधव यांच्या दुकानात घुसले. या वेळी दुकानात असलेले प्रेम विठ्ठल नन्नावरे व मुकुंद अर्जुन कांबळे यांना दमदाटी करत काउंटरमधील तीन हजार पाचशे रुपये व एक मोबाइल हिसकावून घेतला. या वेळी दुकानातील कामगारांना लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर या दुकानापासून जवळच असलेल्या प्रवीण ठकसेन साळवे यांच्या सायकलच्या दुकानात घुसून तेथून जबरदस्तीने पाच हजार रुपये हिसकावून घेतले. तसेच तेथेही लाकडी दांड्याने मारहाण केली, असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: We are Don, pay the installment