वीजेअभावी नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 13:42 IST2017-05-13T13:42:53+5:302017-05-13T13:42:53+5:30
महावितरणकडून दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा खंडित केला जाणार असल्याने आजपासून पुढील तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

वीजेअभावी नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ १३ - महावितरणकडून दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा खंडित केला जाणार असल्याने आजपासून पुढील तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
वितरण कंपनीकडून ३३ केव्ही मुळा डॅम विद्युत वाहिनीवर पूर्व मान्सून दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. झाडे तोडणी व तांत्रिक कामांच्या दुरुस्तीकरीता सकाळी ११ ते ५ यावेळेत विद्युतपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड, पाईपलाइन रोड, मुकुंदनगर, स्टेशन रोड, सारसनगर, विनायकनगर, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, माळीवाडा, गुलमोहोेर रोड, सिव्हील हाडको या ठिकाणी पाणीपुरवठा होणार नसून सोमवारी होईल. सोमवारी सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, नालेगाव, माळीवाडा येथे मंगळवारी पाणीपुरवठा केला जाणार आहे.