पाणीपुरवठा विभागाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:48+5:302021-03-24T04:18:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या एक्स्प्रेस फिडरचा वीज पुरवठा वारंवार तांत्रिक कारणांमुळे खंडित होत आहे. परिणामी, ...

To the water supply department | पाणीपुरवठा विभागाला

पाणीपुरवठा विभागाला

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या एक्स्प्रेस फिडरचा वीज पुरवठा वारंवार तांत्रिक कारणांमुळे खंडित होत आहे. परिणामी, नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा येत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने अखंडित वीज पुरवठा करावा, अशा सूचना नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी मंगळवारी घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. उपकार्यकारी अभियंता अमित कांबळे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक बाळासाहेब गांगड, राजेंद्र पवार, रईस जहागीरदार यावेळी उपस्थित होते.

नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, आगामी काळात होळी, रमजान, रामनवमी, उरूस सण साजरे होणार आहेत. त्यामुळे शहराला नियमित पाणीपुरावठा करावा लागणार आहे.

एक्स्प्रेस फिडरवरील वीज पुरवठ्यात कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत, असे आश्वासन अधिकऱ्यांनी दिले.

----------

Web Title: To the water supply department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.