पाण्याचा योग्य वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:46+5:302021-03-24T04:18:46+5:30
नेवासा न्यायालयात जागतिक पाणी दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ...

पाण्याचा योग्य वापर करावा
नेवासा न्यायालयात जागतिक पाणी दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. बी. जाधव, वरिष्ठ स्तर न्यायाधीश बी. यु. चौधरी, जे. आर. मुलाणी, दिवाणी न्यायाधीश ए. बी. निवारे, पी. व्ही. राऊत, ए. ए. पाचारणे उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक ॲड. के. एच. वाखुरे यांनी केले.
तापकिरे म्हणाले, दुष्काळ जेव्हा पडतो तेव्हा रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागतो, ही उदाहरणे खूप काही सांगून जातात. नागरिक जेव्हा बिगर तोट्याचे नळ वापरतात आणि पाणी वाया जाते तेव्हा खूप वाईट वाटते.
न्यायाधीश मुलाणी म्हणाले, पाणी विकत घ्यावे लागेल असे पूर्वी कुणाला वाटतही नव्हते. भविष्यात तर विकतही पाणी मिळेल की नाही, अशी शंका येते. वृक्षतोड, प्रदूषण, पाण्याची घटत चाललेली पातळी, हे सगळे पाहता पाण्याचे संकट गंभीर बनू शकते. गरजेपुरता पाण्याचा वापर झाला पाहिजे. पाणी हेच जीवन आहे हे समजूनच जगायला शिका. महिलांचे हक्क अधिकार व कायदे या विषयावर महिला वकील एस. एस. लवांडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अधीक्षक एस. जे. लांबदाडे, एस. एस. उलाने, ॲड.सोनल वाखुरे, ए. पी. रिंधे, ए. बी. अडसुरे, किशोर चामुटे, ऋषिकेश गंडाळ हजर होते. ॲड. एस. एस. लवांडे यांनी आभार मानले.
( नेवासा न्यायालय)