शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात नद्यांना पाणी, शेतशिवार मात्र कोरडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 02:01 IST

शेजारील जिल्ह्यात झालेल्या पावसाने धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड नद्या वाहत्या झाल्या आहेत.

अहमदनगर : शेजारील जिल्ह्यात झालेल्या पावसाने धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड नद्या वाहत्या झाल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील १४ पैकी ११ तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्केही पाऊस झालेला नसल्याने शेतशिवार कोरडीच असल्याचे चित्र आहे.जूनच्या प्रारंभीच पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या लांबल्या. तुरळक पावसावर काही भागात मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, भूईमूग, कपाशीची पेरणी झाली. मात्र पावसाने पुन्हा दडी मारली. पिकांना आवश्यक असणारा दुसरा पाऊस जुलैच्या मध्यावर न झाल्याने पिके सुकली. आॅगस्ट उजाडला तरी पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली. थेट १६ आॅगस्टला दोन दिवस झालेल्या भीज पावसावर पिकांना काही अंशी जीवदान मिळाले. पावसाचे सुरूवातीचे अडीच महिने कोरडे गेल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. गावोगावचे पाझर तलाव कोरडे पडत आहेत.सीना, खैरी प्रलल्पांत केवळ २५ टक्के साठापुणे, नाशिक या शेजारच्या जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणे भरली. धरणांतील अतिरिक्त पाणी त्यांनी नदीपात्रात सोडले. त्यामुळे जिल्ह्यात नद्यांना पाणी आाले. संगमनेर (८७ टक्के) व श्रीरामपूर (८५) तालुक्यात पाऊस समाधानकारक असला, तरी कोपरगाव (६८), राहुरी (५५), नेवासा (४४), राहाता (६१), पाथर्डी (५१), शेवगाव (६९), जामखेड (५८), पारनेर (४८), श्रीगोंदा (४४), कर्जत (२७), अहमदनगर (४०) हे तालुके कोरडेच आहेत. सीना, खैरी, मांडओहळ प्रकल्पांत २५ टक्केही पाणीसाठा नाही.

टॅग्स :riverनदीFarmerशेतकरी