पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:17+5:302021-07-14T04:24:17+5:30
अहमदनगर : जलसंकट ही जगासमोर भेडसावणारी मोठी समस्या आहे. पाणी निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य भेट आहे. परंतु पाण्याचा जपून ...

पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य भेट
अहमदनगर : जलसंकट ही जगासमोर भेडसावणारी मोठी समस्या आहे. पाणी निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य भेट आहे. परंतु पाण्याचा जपून वापर न केल्यामुळे मानवजातीपुढे जलसंकट उभे ठाकले आहे. यासाठी समाजात, शाळा, महाविद्यालयामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेचे महत्व पटवूून जनजागृती केली गेली पाहिजे, असे मत अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी व्यक्त केले.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व बी.पी.एच.ई. सोसायटीचे
अहमदनगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भूजल साक्षरता अभियान ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य बार्नबस यांच्या भाषणाने झाले. वरिष्ठ भूवैज्ञानिक (भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे रश्मी कदम यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची ओळख करून दिली. या वेबिनारमध्ये पाण्याची गुणवत्ता याविषयी अमृता काशीद यांनी माहिती दिली. बारव आणि त्यांचे संवर्धन याविषयी रोहन काळे यांनी माहिती दिली. भूजल सर्वेक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग याविषयी भूगोल विभाग प्रमुख डॉ. माया उंडे यांनी माहिती दिली. या वेबिनारमध्ये १४४ पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी.च्या अहमदनगर महाविद्यालयाबरोबरच न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, पेमराज सारडा महाविद्यालय आणि राधाबाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. नागवडे, डॉ. बी. एम. गायकर, डॉ. रज्जाक सय्यद, डॉ. एन. आर. सोमवंशी, समन्वयक डॉ. पी. सी. बेदरकर, प्रबंधक डी. आर. आल्हाट यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. जी. एल. उंडे, डॉ. एस. ए. बोरुडे, डॉ. एम. एस. जाधव, प्रा. अजय काकडे, प्रा. दादासाहेब जवरे, भूगोल विभाग, अहमदनगर महाविद्यालय, आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी यशस्वीपणे केले. आभार डॉ. एस. ए. बोरुडे यांनी मानले.