पाण्यासाठी राष्ट्रवादीने महापालिकेत फोडले माठ

By Admin | Updated: May 22, 2017 13:44 IST2017-05-22T13:44:47+5:302017-05-22T13:44:47+5:30

सावेडी उपनगरातील पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने महापालिकेत माठ फोडून थाळी नाद करण्यात आला़

Water poured into NCP for drinking water | पाण्यासाठी राष्ट्रवादीने महापालिकेत फोडले माठ

पाण्यासाठी राष्ट्रवादीने महापालिकेत फोडले माठ

आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ २२ - सावेडी उपनगरातील पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने महापालिकेत माठ फोडून थाळी नाद करण्यात आला़
राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सोमवारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सावेडी भागातील रहिवासी यांनी आंदोलन सुरु केले़ वाकळे, बारस्कर यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका करीत पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली़ त्यानंतर महिलांनी आणलेले रिकामे माठ महापालिकेच्या दारात फोडण्यात आले़ तेथून आंदोलक आयुक्तांच्या चेंबरकडे गेले़ आयुक्तांच्या दालनासमोरील गॅलरीत कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला़ महिलांनी थाळी नाद करीत महापालिका प्रशासनाला सावेडीकरांचा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली़ झोपलेले प्रशासन जागे झालेच पाहिजे, असे सांगत महिलांनी थाळीनाद करण्यास सुरुवात केली़ यावेळी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाजी करण्यात आली़

Web Title: Water poured into NCP for drinking water