शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी कालव्यांना पाणी

By admin | Updated: August 1, 2014 00:22 IST

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरण ७० टक्के भरले आहे़

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरण ७० टक्के भरले आहे़ या धरणातून गुरूवारी दुपारी तीन वाजता १८ हजार ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत होता़ नांदुर मध्यमेश्वरच्या सांडव्यावरून २१ हजार ५०० क्युसेक पाणी गोदापात्रात कोसळत होते़ त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही गोदावरी नदी प्रवाही राहिली़दारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही कमी अधिक प्रमाणात पाऊस कायम आहे़ बुधवारी रात्री नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे कोपरगाव येथे दुपारपर्यंत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती़ गुरूवारी दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला़ दुपारी तीन वाजता १८ हजार ४०० क्युसेकने पाणी दारणेतून सोडण्यात आले़ पुढे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून २१ हजार ५०० क्युसेकने पाणी नदीपात्रात कोसळत होते़ नांदूर मध्यमेश्वर येथून गोदावरी डाव्या कालव्यात २५० क्युसेकने, तर उजव्या कालव्यात ५०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले़ कालव्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन आहे़ पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटल्याने कोपरगाव, राहाता तालुक्यातील जवळपास ६० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे़गुरूवारी सकाळी सहा वाजता गेल्या चोविस तासात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे़ (कंसातील आकडे एकुण पावसाचे) कोपरगाव- १० (९७), मध्यमेश्वर- ४२ (२१५), शेवगाव- ३५ (१०१), महालखेडा-३५ (११५), ब्राह्मणगाव- २७ (१३२), पढेगाव- ९ (११६) मी़मि़ पाऊस झाल्याचे पाट बंधारे विभागाचे महाले यांनी सांगितले़(प्रतिनिधी)