शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा कर्जतमध्ये  निसटता पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 21:45 IST

महाराष्ट्र राज्याचे जलसंधारणमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा आज निसटता पराभव झाला. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी उत्कृष्ट खेळी करत पालकमंत्री राम शिंदे यांना पराभूत केले

ठळक मुद्देनगराध्यक्ष नामदेव राऊत व तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांची खेळी

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत  : महाराष्ट्र राज्याचे जलसंधारणमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा आज निसटता पराभव झाला. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत व भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांची खेळीने पालकमंत्री राम शिंदे यांना निसटता पराभव स्विकारावा लागला.  निमित्त होते कर्जतमधील गोदड महाराज क्रीडानगरीत छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे. पालकमंत्री राम शिंदे विरुद्ध नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संघात शनिवारी सायंकाळी प्रदर्शनीय सामना रंगला. यामध्ये पालकमंत्री शिंदे यांच्या संघाला पाच गुणांनी पराभव स्वीकारावा लागला.

सायंकाळी रंगलेल्या सामन्यात नगराध्यक्ष राऊत यांच्या संघाने नाणेफेक जिंकली. पहिल्या हाफपासून नगराध्यक्ष राऊत यांचा संघ आघाडीवर होता. दुस-या हाफमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांच्या संघाने आक्रमक खेळ केला. परंतु त्यांना पराभव टाळता आला नाही. आप्पासाहेब घनवट यांनी पालकमंत्र्यांना बाद केले. नगराध्यक्ष राऊत संघाने २१, तर पालकमंत्री संघाने १६ गुण मिळविले. पालकमंत्री शिंदे यांच्या संघात शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, बापूराव तोरडमल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष महेंद्र गुंड, क्रीडाशिक्षक सुनील नेवसे, रेल्वे अधिकारी प्रशांत पाटील, गणेश जेवरे, शिवाजी धांडे, प्रकाश धांडे, राजेंद्र खराडे यांचा समावेश होता. नगराध्यक्ष संघात रावसाहेब गरड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, चापडगावचे सरपंच आप्पासाहेब घनवट, सचिन धोदाड, राम ढेरे, अनिल गदादे, व्यापारी अभय बोरा यांचा समावेश होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेKarjatकर्जतKabaddiकबड्डीMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा