कचरा वेचकांना घनकचरा विभागात रोजगार द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:55+5:302021-03-24T04:19:55+5:30
अहमदनगर : शहरातील कागद-काच-पत्रा गोळा करणाऱ्या असंघटित कामगारांचा घनकचरा व्यवस्थापन विभागात समावेश करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. ...

कचरा वेचकांना घनकचरा विभागात रोजगार द्यावा
अहमदनगर : शहरातील कागद-काच-पत्रा गोळा करणाऱ्या असंघटित कामगारांचा घनकचरा व्यवस्थापन विभागात समावेश करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत गेल्या अनेक वर्षांपासून कचरा वेचकांसाठी काम करत आहेत. मनपाच्या स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिक निर्मूलन, अशा अनेक कार्यक्रमात कचरा वेचकांनी सहभाग घेतला आहे. कामगारांना ओळखपत्रही दिले आहेत. तसेच १८० सभासदांना प्रधानमंत्री कौशल विकास योजनेंतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे. तसेच आरोग्य संबंधित प्राथमिक माहिती देऊन तीन वर्षांचे अपघाती विमा संरक्षण देण्यात आले आहे. तसे प्रमाणपत्र कचरा वेचकांना देण्यात आलेले आहे. अनेक शहरांमध्ये कचरा वेचकांना घनकचरा व्यवस्थापनामध्ये समावेश करून घेण्यात आले आहे. कचरा वेचकांना तीनशे घरे नेमून द्यावीत. त्यातून येणारा ओला व सुका कचरा वेगळा करून सुका कचरा ठेवून ओला कचरा महापालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकून द्यावा, या कामासाठी कचरा वेचकांना मानधन देता येईल का याबाबत चर्चा झालेली आहे. घनकचरा विभागानेही मानधन देता येईल, असे कळविलेले आहे. त्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक विकास भाऊसाहेब उडानशिवे, विकास घाडगे, बाळू कुडे, विकास वाल्लेकर, गणेश ससाने, करण चव्हाण, इंद्रभान कुडे उपस्थित होते.