पिंपळगाव माळवीच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:22 IST2021-04-01T04:22:00+5:302021-04-01T04:22:00+5:30
पिंपळगाव माळवी : सततच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या पिंपळगाव माळवी (ता.नगर) परिसरामध्ये समाधानकारक पावसामुळे यावर्षी विहिरींना समाधानकारक पाणी आहे. ...

पिंपळगाव माळवीच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
पिंपळगाव माळवी : सततच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या पिंपळगाव माळवी (ता.नगर) परिसरामध्ये समाधानकारक पावसामुळे यावर्षी विहिरींना समाधानकारक पाणी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी ऊस, कांदा, गहू, भाजीपाला, हिरवा चारा आदी पिके घेतली आहेत, परंतु या पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठा अपुरा व खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील ट्रान्स्फॉर्मर बंद केले होते. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वीज बिले भरली. परंतु, वीज बिले भरूनही योग्य प्रमाणात वीजपुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पिके जगविण्यासाठी महावितरणने योग्य व नियमित वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे. अन्यथा, महावितरणविरोधात लवकरच आंदोलन करण्याचा इशारा पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिला आहे.