वारी रेल्वे फाटकाच्या रुळातील खड्डे बुजविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:14+5:302021-01-14T04:17:14+5:30

वारी येथील रेल्वे फाटकातून (समपार फाटक क्र. ६२) स्थानिक ग्रामस्थ, वैजापूर, शिर्डीकडे दररोज हजारो साधने जात असतात. विदर्भ, मराठवाड्यातील ...

Wari filled the potholes in the railway tracks | वारी रेल्वे फाटकाच्या रुळातील खड्डे बुजविले

वारी रेल्वे फाटकाच्या रुळातील खड्डे बुजविले

वारी येथील रेल्वे फाटकातून (समपार फाटक क्र. ६२) स्थानिक ग्रामस्थ, वैजापूर, शिर्डीकडे दररोज हजारो साधने जात असतात. विदर्भ, मराठवाड्यातील साई भक्तांच्या पालख्या याच फाटकातून जातात. या फाटकाच्या रुळांचे दुरुस्तीच्या कामासाठी काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाच्यावतीने येथे खोदाई करण्यात आली होती. काम होऊन बरेच दिवस झाले आहे. अद्यापपर्यंत या रुळातील फटीमध्ये असलेले खड्डे दुरुस्त केलेले नव्हते. त्यामुळे या फाटकातील रेल्वे रूळ हे वरती आले होते. वाहनधारकांना जातांना तसेच दुचाकीवरील वयोवृद्ध व्यक्ती, महिला, लहान मुले हे या खड्ड्यांमुळे रेल्वे रुळावर पडून अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटनादेखील घडल्या होत्या. तसेच इतर वाहनांचेही अपघात होत होते. तसेच सध्या ऊस कारखाने सुरू असल्याने ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील मोठी कसरत करावी लागत होती.

...........

या रेल्वे फाटकातील रुळातील खड्ड्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून येथून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. परंतु, या समस्येविषयी लोकमतने वाचा फोडल्याने हे काम झाले असून आम्हांला दिलासा मिळाला आहे.

बाळासाहेब वरकड, ग्रामस्थ, वारी

- - - -

फोटो१४ - वारी रेल्वे फाटक

Web Title: Wari filled the potholes in the railway tracks