सखी मंच सदस्यांसाठी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला...’
By Admin | Updated: July 23, 2014 00:16 IST2014-07-22T23:17:46+5:302014-07-23T00:16:29+5:30
श्रीगोंदा : लोकमत सखी मंच आयोजित लीलावती बन्सी नाहाटा मानवसेवा चॅरीटेबल ट्रस्ट व जागर युवती प्रतिष्ठान प्रस्तुत ‘वऱ्हाड निघालंय लंडनला...’ या धमाल विनोदी नाटकाचे अयोजन करण्यात आले आहे
सखी मंच सदस्यांसाठी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला...’
श्रीगोंदा : लोकमत सखी मंच आयोजित लीलावती बन्सी नाहाटा मानवसेवा चॅरीटेबल ट्रस्ट व जागर युवती प्रतिष्ठान प्रस्तुत ‘वऱ्हाड निघालंय लंडनला...’ या धमाल विनोदी नाटकाचे अयोजन करण्यात आले आहे रविवारी (दि. २७ जुलै ) रोजी दुपारी २ वाजता बालाजी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
‘वऱ्हाड निघालंय लंडनला...’ च्या यशाचे जनक ‘वऱ्हाड’ चे सर्वेसर्वा प्रा. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांच्या स्मृतीस वंदन करून सदर नाटक संदीप पाठक हे सादर करणार आहेत.
प्रा. डॉ लक्ष्मणराव देशपांडे लिखित व मुकुंद कुलकर्णी यांचे दिग्दर्शन सहाय्य असलेले हे धमाल विनोदी नाटक खास श्रीगोंदा येथील संखी मंच सदस्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. हे नाटक सर्व महिलांसाठी विनामुल्य असून सखी मंच सदस्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
(तालुका प्रतिनिधी)