वडाळी, घोडेगाव, आर्वीत सरपंचपदाचे आरक्षण बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:44+5:302021-02-05T06:33:44+5:30
घोडेगाव ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती (महिला) हे निघाले आहे. त्या प्रवर्गातील महिला सदस्य ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या नाहीत. ...

वडाळी, घोडेगाव, आर्वीत सरपंचपदाचे आरक्षण बदलणार
घोडेगाव ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती (महिला) हे निघाले आहे. त्या प्रवर्गातील महिला सदस्य ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या नाहीत.
वडाळी ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (महिला) हे निघाले आहे. या प्रवर्गातील महिला सदस्य ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या नाहीत.
आर्वी, अनगरे ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (महिला) हे निघाले आहे. या प्रवर्गातील महिला सदस्य ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या नाहीत. बाबुर्डी ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती (व्यक्ती) हे निघाले असून, तेथे अनुसूचित जातीची (महिला) निवडून आलेली आहे. सदर महिला व्यक्तीच्या प्रवर्गातून सरपंच होऊ शकते.
बोरी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती व्यक्तीचे निघाले आहे. तेथे अनुसूचित जातीची (महिला) निवडून आलेली आहे. सदर महिला व्यक्तीच्या प्रवर्गातून सरपंच होऊ शकते. मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.