एकपात्री प्रयोगातून मतदार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST2021-08-15T04:22:57+5:302021-08-15T04:22:57+5:30
अहमदनगर : जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमी व मनुष्यबळ विकास केंद्राच्यावतीने नगर-दौंड रस्त्यावरील कासा ...

एकपात्री प्रयोगातून मतदार जनजागृती
अहमदनगर : जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमी व मनुष्यबळ विकास केंद्राच्यावतीने नगर-दौंड रस्त्यावरील कासा संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी स्वच्छता अभियान व मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.
यावेळी कासाचे राज्य प्रकल्प अधिकारी सुनील गायकवाड ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भानुदास होले, अॅड. अनिता दिघे, अॅड. सुनील तोडकर, अॅड. पुष्पा जेजुरकर, संध्या पावसे-जोशी, शाहीर कान्हू सुंबे, डॉ. अमोल बागुल, डॉ. संतोष गि-हे, आरती शिंदे, निकिता वाघचौरे, मंगल सोनवणे, नयना बनकर, पोपट बनकर, वंदना थोरवे, जय युवा संस्थेचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, कासाचे समन्वयक प्रभाकर दळवी, अस्मिता ढोले, मनोहर मिसाळ, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी संध्या जोशी यांनी एकपात्री प्रयोग सादर करून जनजागृती केली. लोककलावंत शाहीर कान्हू सुंबे, कारभारी वाजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोक गीतांच्या माध्यमातून मतदार जागृती व स्वच्छता अभियानाबाबत प्रबोधन केले. या उपक्रमात तृतीयपंथीयांनीही सहभाग नोंदवत प्रबोधन केले.
--
फोटो १३ जनजागृती
ओळी-कासा संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात स्वच्छता व मतदार जनजागृती अभियान राबवून लोककलाकारांनी जनजागृती केली.