मुंबई, पुण्याहून येणारे पाहुणे आता विलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:56+5:302021-04-19T04:18:56+5:30
पारनेर : पुण्या-मुंबईत राहणारे पारनेरकर यांना पारनेर तालुक्यात आल्यावर विलगीकरणामध्ये राहावे लागणार असून, तसे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी ...

मुंबई, पुण्याहून येणारे पाहुणे आता विलगीकरणात
पारनेर : पुण्या-मुंबईत राहणारे पारनेरकर यांना पारनेर तालुक्यात आल्यावर विलगीकरणामध्ये राहावे लागणार असून, तसे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी सरपंच, ग्रामसेवकांना दिले आहेत.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पारनेरमध्ये कोविडचा आढावा घेतला. यावेळी पारनेरच्या लोकसंख्येच्या मानाने रुग्ण जास्त प्रमाणात असून, बाहेरून येणाऱ्या लोकांना विलगीकरणामध्ये ठेवा, अशा सूचना थोरात यांनी केल्या होत्या.
याबाबत प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार ज्योती देवरे यांनी गटविकास अधिकारी किशोर माने, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन बाहेरून येणाऱ्या लोकांचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विलगीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले. गावातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांनी बाहेरून येणाऱ्या लोकांना विलगीकरण कक्षेत ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या.
---
अधिकारी रस्त्यावर, दंडात्मक कारवाई
पारनेर तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू सुरू असून, दुपारी अकरानंतर सर्व किराणा दुकान, भाजीपाला विक्री, पेट्रोल पंप बंद राहणार असून, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
---
१८पारनेर
पारनेर येथे तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह पेट्रोल पंप चालकांबरोबर चर्चा करून पंप सुरू करण्याच्या वेळा निश्चित केल्या.