अहमदनगर : येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात गुरुवारी सकाळी सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची निवडणूक झाली. यात विशाल सुभाष सकट याने सर्वाधिक १८ मते मिळवून विजय मिळविला.विशाल सकट हा राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी आहे. विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकीसाठी चार विद्यार्थी निवडणूक लढवत होते. यामध्ये विशाल सकट याने सर्वाधिक मते मिळविली. निवडीनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे यांच्या हस्ते सकट याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. एम. व्ही. गिते, उपप्राचार्य आर. जी. कोल्हे, समन्वयक डॉ. भाऊसाहेब सोनवणे, डॉ. नवनाथ येठेकर, डॉ. शदर मगर, प्रा. भारती दानवे, धन्यकुमार हराळ, धनंजय लाटे आदी उपस्थित होते.
नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या विद्यापीठ सचिवपदी विशाल सकटची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:47 IST