विसापूर-पिंपळगाव पिसा रस्ता सहा महिन्यांत उखडला
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:51+5:302020-12-05T04:37:51+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर-पिंपळगाव पिसा रस्त्याचे नूतनीकरण सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र, सहा महिन्यांत या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले ...

विसापूर-पिंपळगाव पिसा रस्ता सहा महिन्यांत उखडला
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर-पिंपळगाव पिसा रस्त्याचे नूतनीकरण सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र, सहा महिन्यांत या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर साईडपट्ट्या भरण्याचे कामही प्रलंबित असल्याने डांबरी रस्ता साईडने तुटला आहे.
या रस्त्यावर कांडेकर वस्तीजवळ तयार करण्यात आलेला पूल जमिनीत गाडला गेल्याने पावसाळ्यात त्याच्यावरून पाणी वाहत होते. विसापूर ते ढवळगाव या प्रमुख जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. मागील आठवड्यात या रस्त्यावरील पिंपळगाव पिसा ते निंबवी, कोंडेगव्हाण, ढवळगावपर्यंतचे खड्डे बुजविण्यात आले. मात्र, त्याची रोलिंग न झाल्याने ते निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत.
पिंपळगाव पिसा ते उक्कडगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. ते खड्डे आठवडाभरात बुजविण्याचे काम सुरू करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी अरविंद अम्पालकर यांनी सांगितले.
कोट..
विसापूर-पिंपळगाव पिसा रस्त्याचे काम कोरोना कालावधीत करण्यात आले. पुढे पावसाळा सुरू झाल्याने साईडपट्ट्या भरण्याचे काम मागे ठेवण्यात आले होते. आता साईडपट्ट्या भरण्याचे व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. लवकरच काम पूर्ण होईल.
- अरविंद अम्पालकर,
कार्यकारी अधिकारी, सा. बां. उपविभाग, श्रीगोंदा
फोटो ०७ विसापर रोड
विसापूर ते पिंपळगाव पिसा रस्त्यावर पडलेले खड्डे.