भारतात एकूण १८ कृषी विद्यापीठे आणि भारतीय कृषी अनुसंधान अंतर्गत संस्थांना व्हर्चुअल क्लासरूम देण्यात आल्या आहे. या व्हर्चुअल क्लासरूमचे तोमर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला, सचिव त्रिलोचन महापात्र, संजय कुमार सिंह, डॉ. अशोक फरांदे ऑनलाईन उपस्थित होते.
तोमर म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश असून कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या कृषी क्षेत्राचा आधार शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आहे. कृषी पदवीधरांनी कृषी उद्योजक व्हावे. कृषीच्या ज्ञानाचा शेतक-यांमध्ये प्रसार करावा आणि कृषीमधील नवनवीन संकल्पना घेऊन संशोधन करावे.
रूपाला म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीमध्येसुद्धा ऑनलाईन प्रणालीमुळे शिक्षण थांबलेले नाही. आजकालचे विद्यार्थी भाग्यशाली आहे. कारण त्यांना अद्ययावत ऑनलाईन शिक्षण प्रणालीतून शिक्षण मिळत आहे. या विद्यार्थ्यांनी व्हर्चुअल क्लासरूमचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. महासंचालक त्रिलोचन महापात्र यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमोद रसाळ, अधिष्ठाता रणपिसे, मिलिंद अहिरे उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाची व्यवस्था व्हर्चुअल क्लासरूमचे नोडल अधिकारी डॉ. एम.आर. पाटील यांनी केली. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी देशभरातील विविध कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार राजेंद्र प्रसाद यांनी मानले.