इमामपूर येथे तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:26+5:302021-06-22T04:15:26+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील इमामपूर येथे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या ...

इमामपूर येथे तुंबळ हाणामारी
केडगाव : नगर तालुक्यातील इमामपूर येथे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
भगवान बाजीराव बोठे (वय २६, रा. इमामपूर) यांनी याबाबत पहिली फिर्याद दिली. भगवान बाेठे यांची आई इमामपूर येथील गट नंबर २८६ मधील शेतातील बांधाच्या बाभळी तोडत असताना तुकाराम यशवंत टिमकरे, उदय रामदास टिमकरे, रामदास तुकाराम टिमकरे यांनी शिवीगाळ केली. तेव्हा बोठे हे हॉटेल हनुमान येथे विचारण्यासाठी गेले असता वरील तिघांनी लोखंडी गज, स्टंप व दांडक्याने उजव्या खांद्यावर पाठीत व हातावर मारहाण करून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद रामदास तुकाराम टिमकरे (वय ४२, रा. इमामपूर) यांनी दिली आहे. यात टिमकरे यांनी म्हटले की, वडील इमामपूर शिवारातील नगर-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या हॉटेल हनुमान येथे असताना माझ्या वडिलांना तुम्ही हॉटेलची जागा सोडून द्या, ती आमची आहे असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच भगवान बोठे याने कोयत्याने उजव्या कानाच्या खाली खांद्यावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून बाजीराव भानुदास बोठे, बबन बाजीराव बोठे, भगवान बाजीराव बोठे, मिठू बाजीराव बोठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.