विनयभंग भोवला : बाळ बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 13:52 IST2021-03-26T13:51:49+5:302021-03-26T13:52:23+5:30

विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने बाळ बोठे याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे

Violence: A one-day police custody for Bal Bothe | विनयभंग भोवला : बाळ बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी

विनयभंग भोवला : बाळ बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी

अहमदनगर: विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने बाळ बोठे याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात बोठे याची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले होते. त्याला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. बोठे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाच्यावतीने करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने  बोठेला एका दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

Web Title: Violence: A one-day police custody for Bal Bothe