शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अटी-शर्तींचा भंग : १३६ छावण्यांना ४४ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 19:33 IST

जनावरांच्या छावण्या चालवताना छावणीचालकांनी अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ छावणीचालकांना ४४ लाख ३७ हजार ५६० रूपयांचा दंड ठोठावला आहे.

अहमदनगर : जनावरांच्या छावण्या चालवताना छावणीचालकांनी अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ छावणीचालकांना ४४ लाख ३७ हजार ५६० रूपयांचा दंड ठोठावला आहे.जिल्ह्यात सध्या २५० छावण्या सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांद्वारे या छावण्यांची तपासणी करून तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला जातो. छावणीत चारा आवक रजिस्टर नसणे, पशुखाद्य, मुरघास न देणे, आवक चारा व पशुखाद्य पंचनामा नसणे, जनावरांची संख्या दर्शवणारे फलक नसणे, कडबाकुट्टी, जनावरांना बिल्ले नसणे अशा अनेक त्रुटी आढळल्याने या छावणीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.मंगळवारी (दि. ९) बारा छावण्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये नगर तालुका खरेदी विक्री संघ (रूईछत्तीशी)३ लाख ९० हजार, झुलेलाल मजूर संस्था (साकत) १५ हजार ५२०, वैभव नागरी पतसंस्था (हातवळण)- १ लाख ७७ हजार ७००, मानव आधार प्रतिष्ठान (मठपिंप्री) ४१ हजार २७५, वैभव नागरी पतसंस्था (तांदळी वडगाव) १७ हजार ६४५, गुणवाडी सेवा सोसायटी- १२ हजार ४०, यशांजली ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (घोसपुरी) १ लाख ३४ हजार ६४५, सारोळा कासार सोसायटी -३ लाख ३४ हजार ५३०, पद्मावती बहुउद्देशीय संस्था (घोसपुरी) ५५ हजार १५०, कानिफनाथ मजूर सहकारी पतसंस्था (निमगाव वाघा) १ लाख ११ हजार ९९०, चास सेवा सोसायटी - ८ हजार ८७०, विशाल सहकारी दूध उत्पादक संस्था (सारोळा कासार) १ लाख १० हजार ७९०. एकूण - १४ लाख १० हजार २१०.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यापूर्वी १२४ छावणीचालकांना ३० लाख २१ हजार रूपयांचा दंड केला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण १३६ छावण्यांना ४४ लाख ३७ हजार ५६० रूपयांची दंडात्मक कारवाई झालेली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय